ग्रामपंचायत व यात्रा कमिटी कडून यात्रेची जय्यत तयारी
दि 20 रोजी फक्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
साखरवाडी (गणेश पवार)
सुरवडी तालुका फलटण गावच्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेस आज दिनांक 17 एप्रिल पासून सुरुवात होत असून ग्रामपंचायत सुरवडी व यात्रा कमिटी यांनी ग्रामदैवताच्या यात्रेची जय्यत तयारी केली असून फलटण तालुक्यात आदर्श निर्माण करीत महिलांसाठी दिनांक 20 रोजी महाराष्ट्राची गौरवगाथा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सुरवडी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीने तालुक्यात आदर्श घातला आहे आज सोमवारी रात्री 10 वाजता देवाची पालखी ( छबिना ) निमित्त प्रसिद्ध हलगी पथक , नटराज ब्रास बँड फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे मंगळवार १८ एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदकुमार भिसे पाटील यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कुस्त्यांचे भव्य जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे . 1 लाख ते 10 हजार रुपये इनाम असणाऱ्या ठरवलेल्या व 50 ते 2 हजार रुपयांच्या फडात कुस्त्या होणार आहेत रात्री 9.30 वाजता माया खुटेगावकर यांचा 'अहो नादच खुळा' हा सदाबहार लावण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.त्यानंतर बुधवारी 19 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता लावणी सम्राज्ञी शांताबाईचा जलवा हा लावण्यांचा भारदार कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी या ठिकाणी सादर होणार आहेत तसेच फलटण तालुक्यामध्ये आदर्शवत गुरुवार दिनांक 20 रोजी खास महिलांसाठी महाराष्ट्राची गौरवगाथा हा कार्यक्रम रात्री 9. 30 वाजता मराठी शाळेच्या प्रारंगणात होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे