Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बुथ सशक्तिकरण अभियान यशस्वी करून खा. रणजितसिंहांचे हात बळकट करा- मुरलीधर मोहोळ pradesh sarchitanis

 


साखरवाडी(गणेश पवार)

बूथ सशक्तिकरण अभियानातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी हात बळकट करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दि 19 रोजी  फलटण येथे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली  बुथ  सशक्तिकरण अभियान, शक्ति केंद्रप्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली  यावेळी केले 

 यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, लोकसभा कोअर कमिटी सदस्य विश्वासराव भोसले, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, अँड नरसिंह निकम, मंडलाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर, उपस्थित होते.. यावेळी मार्गदर्शन करताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, संघटनेच्या एकीच्या जीवावर भाजपने देशात व राज्यात सत्ता मिळवली आगामी काळात बुथ सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून गावा गावामध्ये संघटना बळकट करण्याचे  प्रदेशाध्यक्ष बावनकुळे  यांनी सांगितले आहे. भाजपामध्ये संघटनात्मक काम कायम सुरू असते संघटना ही शक्ती म्हणून गाव पातळीवर कायम  काम करत असते  पक्षामध्ये शक्ती केंद्रप्रमुख याचे काम महत्त्वपूर्ण आहे तसेच बुथ अध्यक्ष हा पक्षाचा मुख्य कणा आहे  यावेळी आपल्याला ५१ टक्के मत घ्यायची आहेत त्यामुळे बुथवर तीस लोकांच्या सदस्यांची यादी करून त्यांना सरल ॲप मध्ये नोंदणी करायची आहे. तसेच त्या ग्रुपमध्ये मन की बात प्रमुख व्हाट्सअप ग्रुप प्रमुख , सोशल मिडिया प्रमुख, केंद्रीय व राज्यस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावांमध्ये ग्रुप तयार करून केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करावे. यावेळी बोलताना मुरलीधर म्हणाले की खा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी   केंद्रातून व राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खेचुन आणला आहे. त्यामुळे गावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या केलेल्या कामाची माहिती सोशल मीडिया मार्फत पोचवावी व भविष्यातील राजकारणासाठी खासदार रणजितसिंह. 

नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी बुथ अभियान यशस्वी करावे असे आव्हान मुरलीधर मोहोळ यांनी केले .यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  सांगितले की मी मतदार संघातील जनतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी  उपलब्ध करून दिला आहे.  मी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असून पक्षाने आपल्याला इतकी मोठी ताकद दिल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले काम करावे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी बुथ व शक्ति केंद्र अभियान यशस्वीपणे राबवावे . जे गाव ३० तारखेच्या अगोदर प्रत्येक बूथ वर ५० सदस्य व सरल ॲप मध्ये नोंदणी करतील तसेच संपूर्ण बुथ  सशक्तिकरण अभियान यशस्वी राबवतील त्या गावाला पाच लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आव्हान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले . यावेळी जयकुमार शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण कार्याचा आढावा दिला व हे अभियान  यशस्वी करू असे सांगितले .या कार्यक्रमास युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव ,नगरसेवक सचिन अहिवळे, महिला अध्यक्ष उषा राऊत, धनंजय पवार, सुनील जाधव ,बबलू मोमीन, रियाज इनामदार, राजेंद्र काकडे, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी  मंडल अध्यक्ष बजरंग गावडे यांनी स्वागत केले व माहिती दिली प्रस्ताविक संतोष सावंत यांनी केले व आभार शहराध्यक्ष  अमोल सस्ते यांनी मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.