साखरवाडी(गणेश पवार)
खंडाळा तालुक्यातील पाडळी आणि बोरी परिसराला अवकाळी गारांच्या पाऊसाने झोडपून काढले .सर्वत्र गारांचा सडा पडला होता त्यामुळे या परिसराला जम्मू काश्मीरच्या स्वरूप आले होते . सोसाट्याचा वारा , मेघ गर्जनेसह झालेल्या पाऊसाने पाणीच पाणी केले .
दरम्यान ,वाई खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अवकाळी व गारांच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची सुचना आमदार मकरंद पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना केलीय .
पाडळी आणि बोरी परिसरामध्येआज दुपारी अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी जोरदार गारांच्या पावसाने परिसराला झोपून काढलं. या सर्व पावसामध्ये पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी वर्ग व नागरिकांची तारांबळ उडाली .
आज सकाळपासूनच प्रचंड असा उकाडा जाणवत होता . दुपारनंतर मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. या पावसाबरोबरच गारांचा वर्षाव सुरू झाला .या परिसरातील नागरिकांनी आडोशाला आश्रय घेतला .
खंडाळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालय
वाई खंडाळा महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी व गारांच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे व अन्य नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार मकरंद पाटील यांनी वाईचे प्रांताधिकारी वाई खंडाळा व महाबळेश्वरचे तहसीलदार यांना केल्या आहेत .