Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणी विकास सोसायटीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता vidani





 विडणी -(योगेश निकाळजे) -विडणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक 2023च्या निवडणूकीत राजेगटाने दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा सोसायटीवर आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.

        फलटण तालुक्यात नावलौकिक असणारी व सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या विडणी विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीतमध्ये राष्ट्रवादी  पुरस्कृत  उत्तरेश्वर पॅनेलने श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या नेतृत्वाखाली 13 पैकीब13 जागा  जिंकून पुन्हा एकदा सोसायटीवर राजेगटाचीच एकहाती सत्ता मिळवली असल्याने राष्ट्रवादीमधील सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण  आहे, निकाल जाहीर झाल्यानंतर मोठया प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली तसेच गावातून सर्व विजयी उमेदवारांची वाजतगाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली

     या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनेल व भाजप पुरस्कृत विडणी विकास आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली,ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती त्यामूळे निवडणूकीच्या प्रचारसभेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर,डॉ.बाळासाहेब शेंडे खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,सरपंच सागर अभंग इत्यादींनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या म्हणून या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

     सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी  मोठी गर्दी केली होती याठिकाणी मोठा पोलिस फाटाही तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार न घडता ही निवडणूक शांततेत पार पडली. सर्व विजयी उमेदवारांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,आमदार दिपकराव चव्हाण इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.

  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.