शेतकऱ्यांपुढे ऐन उन्हाळ्यात नवीन संकट
साखरवाडी(गणेश पवार)
फलटण तालुक्यात ट्रान्सफार्मर चोरीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेईना फलटण तालुक्यातील सुरवडी, मुरूम, वाठार निंबाळकर,कुरवली खुर्द या गावातील सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 4 ट्रान्सफार्मर दिनांक 14 मार्च रोजी एकाच रात्री चोरीला गेल्याची फिर्याद महावितरणचे कर्मचारी राहुल महालिंगे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ट्रान्सफार्मर चोरीमुळे शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहिले असून ट्रान्सफार्मर चोरीने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास ए एल काशीद करीत आहेत.