Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास आम्ही दहापट्टीने तयार आहोत- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर vidani




विडणी -(योगेश निकाळजे ) -


विडणीत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोधकांकडून दमदाटी केली जात आहे,मात्र विरोधकांनी आम्ही त्यांना घाबरून जाऊ या भ्रमात राहू नये अन्यथा जशाच तसे उत्तर देण्यासाठी आम्ही दहापट्टीने तयार आहोत असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला.

      विडणी कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून या निवडणूकीची सांगता प्रचार सभा विडणीत आयोजीत करण्यात आली यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते,या कार्यक्रमास आमदार दिपकराव चव्हाण श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,सर्जेराव नाळे,डॉ. उत्तमराव शेंडे, जगन्नाथ नाळे,दादासाहेब बुरुंगले,उपसरपंच सुनिल अब्दागिरे,सहदेव शेंडे,हणमंतराव टेंबरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

       गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्याचे राजकारण करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायच ही एकप्रकारची तालुक्याची संस्कृती असून सर्वांना प्रत्येकाच्या पदानुसार मानसन्मान दिला जातो मात्र विडणीत वेगळ्याच प्रकारची प्रवृत्ती सुरू झाली असल्याने तीला विडणी सोसायटीच्या निवडणूकीत मतदारांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून वेळीच ठेचून बाजूला केली पाहिजे असे मतही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की विरोधकांना आता केवळ आपल्यावर टिका करण्याशिवाय उद्योग नसून त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही कारण ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असतात मात्र आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे व ती आपण जपणार असल्याने ही निवडणूक शांत वातावरणात होईल ही आपली जबाबदारी असून विरोधकांना आपण मतदानाच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

     फलटण तालुका हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुजलम सुफलम झाला असून हेच विरोधकांना खटकत असल्याने त्यांच्यावर टिका करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे, सध्या तालुक्यात गलिच्छ राजकारण सुरू असून त्यांना वेळीच आपण थांबवणे गरजेचे आहे, विडणी सोसायटीची निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची असल्याने आता मतदारांनी उत्तरेश्वर पॅनलला साथ द्यावी असे आवाहन यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.


      विडणीत विरोधक न केलेल्या कामांचे श्रेय घेत असून राष्ट्रवादी पक्षाने मंजूर केलेल्या कामांचेच ते नारळ फोडत असून लोकांमध्ये संभ्रम तयार करत आहेत असे सांगून या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व पुराव्यांनीशी लाव रे तो व्हिडिओ असे म्हणत स्क्रिनवर सर्व मंजूर केलेल्या विकास कामांचा तपशील लोकांसमोर दाखवला .

    या कार्यक्रमात आमदार दिपकराव चव्हाण, डॉ.उत्तमराव शेंडे,डॉ. रवि शेंडे, उपसरपंच सुनिल अब्दागिरे, दत्ता अब्दागिरे, प्रेमजीत अभंग इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली,कार्यक्रमास विडणी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते, सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार किशोर ननावरे यांनी मानले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.