Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीत ग्राहक पंचायत कडून ग्राहक दिन उत्साहात साजरा grahak

 




साखरवाडी (गणेश पवार)


 जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत शाखा साखरवाडी, यांच्या वतीने साखरवाडी येथील ग्राहक पंचायतीच्या कार्यालयात, मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथमता मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्राहक पंचायत व संलग्न प्रवासी महासंघाचे,  विशाल नाळे यांनी, ग्राहक दिनाचे महत्त्व सांगून, ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव उपस्थितांना करून दिली. ग्राहक पंचायतीचे, कुमार भगत यांनी, दिलखुलासपणे केलेल्या आपल्या भाषणातून, ग्राहकांनी फसवणूक झाली असल्यास, न घाबरता तक्रार केल्यास विना मोबदला न्याय मार्गाने जाता येते, ग्राहकांनी जागरूकपणे व्यवहार केल्यास फसवणूक टाळता येते, यासाठी ग्राहक पंचायत नेहमीच आपल्या पाठीशी असेल, ग्राहक पंचायतीचे, रविंद्र वेदपाठक यांनी  ग्राहकाचे हक्क आणि कर्तव्य या लेखाचे, अभिवाचन करून दाखवले, ग्राहक पंचायत, संलग्न प्रवासी महासंघ शाखा, सातारा. सचिव व ग्राहक पंचायत साखरवाडी अध्यक्ष  सोमनाथ मागाडे यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा लोकांच्या समोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. व आम्ही सर्वजण रात्रंदिवस आपल्या सेवेत राहू असा दिलासा दिला. ग्राहक पंचायतीचे प्रणेते कै. बिंदू माधव जोशी यांच्या समवेत काम केलेले व ग्राहक पंचायतीचे जेष्ठ सल्लागार किसनराव भोसले उर्फ काका यांचे नेहमीच आम्हा सर्वांनाच योग्य मार्गदर्शन लाभत असल्यामुळे त्यांच्या अभिनंदनचा ठराव  उमेश बावकर यांनी मांडला. त्यांनी आपल्या भाषणात, ग्राहकांनी जागृत राहून खरेदी विक्रीचे व्यवहार केले पाहिजेत, तसेच एस टी महामंडळ, वीज महामंडळ, पेट्रोल पंप, गॅस वितरण सेवा केंद्र, इत्यादी ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन तक्रार पुस्तिका ठेवलेली आहे. अडचण आल्यास सदर ठिकाणी आपली तक्रार नोंदवून न्याय मागता येतो न मिळाल्यास ग्राहक पंचायतीकडे तक्रार नोंदवून, ग्राहक न्याय कक्षा द्वारे दाद मागता येते. सदर, कार्यक्रमास महावीर एंटरप्राइजेस,  शंकर काटकर आणि राष्ट्रीय खेळाडू  सुधीर काटकर, ज्येष्ठ नागरिक, मार्गदर्शक  सुनील भोसले उर्फ तात्या व साखरवाडीतील बहुसंख्य ग्राहक बंधू उपस्थित होते सर्वांचे अरविंद किंकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.