साखरवाडी (गणेश पवार)
गिरवी (ता फलटण) येथून अज्ञात इसमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेलेची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर अल्पवयीन मुलीच्या नातलगांनी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली असून दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजले नंतर संबंधित अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचे म्हटले आहे त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक धोंगडे करीत आहेत