विडणी (योगेश निकाळजे) - सध्या जिल्हा परिषद शाळेंचा शैक्षणिक दर्जा हा उंचावत असून यासाठी शासनाच्यानिधी व्यतीरिक्त ग्रामस्थ व पालकांनीही योगदान करणे आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव धीरज अभंग यांनी व्यक्त केले.
विडणी ता. फलटण येथील विद्यानगर मधील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळेच्याभौतिक सुविधांचे व नवीन बांधण्यात आलेल्या खोल्यांचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धीरज अभंग बोलत होते यावेळी उपसरपंच सौ. मनिषा नाळे , ग्रामविकास अधिकारी अंकूश टेंबरे , ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग,सहदेव शेंडे, मारुतीराव कोकरे,अंकूश आदलिंगे ,कुंदन शेंडे, योगेश इंगळे,ॲड.अविनाश अभंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यानगर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायत ,पालक व ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीतून नवीन दोन आरसीसीच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत तसेच या शाळेमध्ये इंटरॲक्टिव्ह पॅनल बोर्ड, सौर ऊर्जा युनिट ,वॉटर प्युरिफायर व कुलर , हँड वॉश स्टेशन इत्यादी भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या शाळेने नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल सारख्या परिक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून राज्यस्तरीय नावलौकिक मिळवला असल्याचेही यावेळी धीरज अभंग यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच सौ. मनिषा नाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले नंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा व इतर कामांचे उदघाटन करण्यात आले तसेच विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सरपंच सागर अभंग , गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया शेंडे व मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला , उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक राजाराम तांबे यांनी केले तर आभार उपशिक्षक रविंद्र परमाळे यांनी मानले.