फलटण चौफेर दि १७ ऑगस्ट २०२५
साखरवाडी ता फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यातील बहुप्रतिक्षित कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा (PF) प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा तोडगा निघाला असून सर्वोच्च न्यायालय व पीएफ कमिशनर यांच्या निर्देशाने७३ टक्के राहिलेली रक्कम सेवानिवृत्त कामगारांच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले
२०१७-१८ मध्ये आर्थिक अडचणीमुळे न्यू फलटण शुगर वर्क्स लि. कारखाना बंद पडला होता. २०१९ मध्ये एनसीएलटी कोर्टाच्या माध्यमातून हा कारखाना श्री दत्त इंडिया कंपनीने विकत घेतला. कामगारांचे सर्व प्रश्न सुटले होते; मात्र भविष्य निर्वाह निधी न्यायप्रविष्ठ असल्याने प्रलंबित राहिला होता. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये श्री दत्त इंडियाने कारखाना घेतेवेळी ४.५ कोटी रुपये फंड कमिशनरकडे जमा करण्यात आले होते ती रक्कम २७% प्रमाणे सर्व कामगारांच्या खात्यावर जमा झाली होती, मात्र ७३% रक्कम थांबली होती.या प्रश्नावर आज कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात आ रामराजे यांनी फलटण तालुका साखर कामगार युनियन, सेवा निवृत्त कामगार व श्री दत्त इंडिया व्यवस्थापन यांच्या सोबत शिष्टाई केली. त्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरच थकबाकी रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला संचालक जितेंद्र धारू, चेतन धारू, कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप,चीफ अकाउंटंट अमोल शिंदे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड,पोपट भोसले, पै संतोष भोसले,संजय जाधव,ग्रा प सदस्य मच्छिंद्र भोसले, उद्योजक संजय भोसले, सेवानिवृत्त कामगार दयानंद गायकवाड, गोरख भोसले,मारुती माडकर, प्रकाश चव्हाण,सीताराम गायकवाड,कुंडलिक भोसले साखरवाडीतील राजे गटाचेकार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.निर्णयाचे स्वागत करताना सेवानिवृत्त कामगारांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना पुष्पहार घालून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.