फलटण चौफेर दि २२ ऑगस्ट २०२५: चौधरवाडी फलटण येथे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी जीवामृत बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. संजय शिर्के यांनी जीवामृतचे प्रशिक्षण दिले.यामध्ये विविध माहिती दिली जसे की,जीवामृत हे एक सेंद्रिय खत आहे, जे नैसर्गिक घटकांनी बनलेले आहे. यात शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ, माती आणि पाणी यांचा वापर केला जातो. हे मातीतील सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून काम करते आणि त्यांची वाढ होण्यास मदत करते, ज्यामुळे मातीची सुपीकता वाढते. जीवामृत पिकांसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि त्यांची वाढ चांगली होते.
कृती:
सर्वप्रथम, एका मोठ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये 100 लीटर पाणी घेतले,10 लीटर आंबट ताक टाकले, त्यामध्ये 10 किलो शेण आणि 5-10 लीटर गोमूत्र टाकले. त्यानंतर 2 किलो गूळ आणि शेवटी, 1 मूठभर माती टाकली आणि सर्व मिश्रण चांगले ढवळून घेतले. हे मिश्रण 48 तास सावलीत ठेवले आणि दिवसातून 2 वेळा ढवळत राहिलो. 48 तासांनंतर, ताकाचे जीवामृत वापरण्यासाठी तयार आहे.
जीवामृत प्रशिक्षण घेण्यासाठी संजय शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषीकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत काटकर स्नेहा संजयकुमार, कदम रोहिणी लक्ष्मण, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कांबळे प्रणोती सुनील, कांबळे सानिका अमोल,लडकत श्रेया संजय, या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.