फलटणचा चौफेर | २५ जुलै २०२५
जगताप वस्ती (सुरवडी - माळीमळा) येथे संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला. या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवेसाठी कीर्तनकार डॉ. योगेश नाळे महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून संत सावतामाळी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भाविकांना अध्यात्मिक आणि सामाजिक मार्गदर्शन केले. उपस्थित भक्तमंडळींनी कीर्तन सेवेला मोठा प्रतिसाद दिला.
या सोहळ्याला सुरवडी गावचे जेष्ठ नेते मा. प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून संतांच्या समाधीचे दर्शन घेतले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात शारदा देवी महिला बचत गटाकडून समाधी मंडळासाठी भांडीसेट भेट देण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य असून महिला बचत गटांच्या सामाजिक सहभागाची प्रचीती यानिमित्ताने आली. कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.