फलटण चौफेर दि २३ जुलै २०२५
कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ सोहळा आज बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोळकी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर हे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार दीपकराव चव्हाण (फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघ) भूषविणार आहेत.यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण) व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा) हे सन्माननीय उपस्थिती म्हणून उपस्थित राहतील.कार्यक्रमात गावामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, हायमास्ट लाईट्स, ग्रामसचिवालयाचे विकास कामे यांचा लोकार्पण व शुभारंभ होणार आहे.कार्यक्रमाचे स्वागत व आयोजन सौ. अपर्णा विकास पखाले (सरपंच, ग्रामपंचायत कोळकी) व डॉ. अशोक नाळे (उपसरपंच) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.