फलटण चौफेर दि २६ जुलै २०२५
निरा खोऱ्यातील चार प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. आज (२६ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण जलसाठा ४२.४७० टीएमसी झाला असून हा ८७.८८ टक्के आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ३७.१९१ टीएमसी (७६.९५%) इतका होता.
धरणनिहाय स्थिती –भाटघर धरणात १८ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या २१.९११ टीएमसी (९३.२३%) साठा आहे.निरा देवघर धरणात ७४ मिमी पावसाची नोंद झाली असून साठा ९.५३९ टीएमसी (८१.३२%) इतका आहे.वीर धरणात १२ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या ८.३३९ टीएमसी (८८.६४%) पाणी आहे.गुंजवणी धरणात ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून साठा २.६७५ टीएमसी (७२.५०%) इतका आहे. धरणातून निरा डावा कालवा – ८२७ क्यूसेक आणि उजव्या कालव्यामधून – १५५० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. गुंजवणी धरणातून २५० क्यूसेक पाणी वीज निर्मितीसाठी (PH) सोडले जात आहे.मागील २४ तासांत चारही धरणांमध्ये एकूण १.७९४ टीएमसी इतका पाण्याचा ओघ आला आहे. त्यामुळे निरा खोऱ्यातील पाणी परिस्थिती समाधानकारक असून पुढील काही दिवसांत ही धरणे १००% क्षमतेला पोहोचण्याची शक्यता आहे