"आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्याची, क्षमतेची ओळख असणे आवश्यक असते. जी व्यक्ती स्वतःमधील सुप्त शक्ती ओळखते तीच जीवनात यशाचे शिखर गाठते," असा संदेश देत मातोश्री कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा आणि बांधकाम क्षेत्रातील यशस्वी उद्योजक संजय गणपत भोसले यांचा आज वाढदिवस दि २४ रोजी उत्साहात साजरा झाला
वडील शिक्षक असल्याने लहानपणापासूनच शिस्त, प्रामाणिकपणा व मेहनतीचे संस्कार घरात होते. शिक्षणात उत्तुंग कामगिरी करत त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली. व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकताना त्यांनी 'मातोश्री कन्स्ट्रक्शन' या नावाने बांधकाम क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली.
आपल्या मेहनतीने, स्पष्ट ध्येयाने व योग्य दृष्टिकोनाने त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर कुटुंबाचे आणि गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे.आज वाढदिवसानिमित्त कृपासिंधू अॅल्युमिनियम अँड ग्लासेस, साखरवाडीचे सुशांत वेदपाठक यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.