Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जि. प. प्राथमिक शाळा, सुरवडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 


फलटण चौफेर दि १७ जून २०२५

सुरवडी, ता. फलटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथे सोमवार, दि. १६ जून  रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी नव्याने दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सुरवडीच्या सरपंच  शरयू जितेंद्र साळुंखे (पाटील) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून  सूर्यकांत पवार (उपसरपंच, ग्रामपंचायत सुरवडी),रणजीत साळवे (चेअरमन, वि.वि.का. सोसायटी सुरवडी),  संपत साळुंखे (व्हाईस चेअरमन, वि.वि.का. सोसायटी सुरवडी), तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  तुषार जगताप, उपाध्यक्ष  सुरज भोसले आणि सर्व मान्यवर ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प, बिस्किट व चॉकलेट देऊन त्यांचे खास स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वर्गशिक्षिका श्रीमती अनुराधा चव्हाण मॅडम यांनी फुग्यांनी आणि फुलांनी आकर्षक सजावट केली होती.


सरपंच मा. सौ. शरयू साळुंखे यांच्या वतीने १५० ग्लुकोज बिस्किट पुडे, चेअरमन श्री रणजीत साळवे यांच्या वतीने ३६ बिस्किट पुडे आणि चॉकलेट, श्री बाळासो जगताप व श्रीरंग पवार यांच्या वतीने चॉकलेट भरणी, शाळा व्यवस्थापन समितीकडून चॉकलेट पुडे आणि शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना गोड जिलेबी वाटप करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळेला भेट’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन मॅडम यांच्या सूचनेनुसार, शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छता, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर या दिवशी विशेष भर देण्यात आला.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री सतीश नलावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल कोळेकर सरांनी तर आभार प्रदर्शन सौ. ललिता कुंभार मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.