Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांच्या सोयीसाठी फलटण नगरपालिका सज्ज-निखिल मोरे

 




फलटण चौफेर दि ६ जून २०२५

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दि. २८ जून रोजी फलटण मुक्कामी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटण नगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर असल्याचे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. 



पालखी आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर फलटण पालिकेकडून सुरु असलेल्या पूर्वतयारीबाबत माहिती देताना निखील मोरे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पालिकेकडून पाठपुरावा करण्यात आला असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील पुलांचे तुटलेले रेलिंग तातडीने बसवण्यात येणार आहे. 


वारकर्‍यांसाठी पाण्याची सोय म्हणून शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात एक आठवडा पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकर्‍यांचे पाण्याचे टँकर भरण्यासाठी पालिकेच्या टँकवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी नमूद केले आहे. 



वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी वारकर्‍यांचे माल वाहतूक ट्रक व अन्य वाहनांसाठी विशेष मार्गाची आखणी केली जात आहे, असेही मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले आहे. 


पालखी तळावर पावसामुळे अडचण निर्माण होवू नये यासाठी चांगल्या दर्जाची डागडुजी, लाईटसाठी ८ सॅटेलाईट पॉईंट, छोट्या - मोठ्या जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पालखी तळावर तात्पुरत्या शौचालयाची सुविधा व त्याठिकाणी लाईटची सुविधा देण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करुन वारकर्‍यांची फलटण शहरात गैरसोय होणार नाही यासाठी फलटण पालिका सर्वतोपरी खबरदारी घेणार असल्याचेही निखील मोरे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.