फलटण चौफेर दि २३ जून २०२५
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (दि. २२) पार पडले. यामध्ये ८८.४८ टक्के मतदान झाले.वाढलेला मतांतील टक्का कुणाच्या कुणाच्या पथ्यावर पडणार, हे उद्या कळणार आहे.
आता कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चौरंगी लढत झाल्याचे चित्र आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकडणूक पॅनल, तावरे गुरू शिष्यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल, ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांचे बळीराजा सहकार बचाव पॅनल, कष्टकरी शेतकरी समितीचे पॅनल आणि अपक्ष यांच्यात सामना रंगला