Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

''कृषीकन्यांनी केला जागतिक योग दिन उत्साहात साजरा.''



फलटण चौफेर दि २३ जून २०२५

फडतरवाडी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीकन्यांनी केला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे; ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे; मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद; विचार, संयम, पूर्तता; आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वतःचा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा केला जातो." या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.


तसेच कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे , निधी कोडपे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला .या कार्यक्रमा साठी 

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतिषा पंडित, प्रा. सुरेश साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.