फलटण चौफेर दि १५ मे २०२५
यश म्हणजे, आपण जे ध्येय निश्चित केले आहे, त्या दिशेने, ते ध्येय साध्य करण्यासाठी खंबीरपणे केलेली वाटचाल, म्हणजेच मिळालेले यश होय.आयुष्यात तुमचे ध्येय, टार्गेट, अभ्यासातील चिकाटी, महत्वाची असते, त्याच्यामुळे मिळालेल्या यशामुळे तुमच्या जगण्याला आयुष्याला दिशा मिळते.
यशस्वी होण्यासाठी तुम्ही जे काम हाती घ्याल, त्याचा निश्चित आराखडा करा, नियोजन करा, ठरवलेली योजना निश्चित वेळेत, योग्य गुणवत्तेसह, नियोजन पूर्वक पूर्ण करता, तेव्हा तुम्ही यशस्वी होता हे यश नुसते यश नसून ते ते गुणात्मक दृष्टीने उच्च दर्जाचे यश ठरते.
अशाप्रकारे नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालानुसार, विद्या प्रतिष्ठान, बारामती संचलित सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मधून, साखरवाडीतील पंडित ज्वेलरचे प्रतिष्ठित व्यापारी श्री दीपक पंडित यांचे चि. आदित्य याने ९९.२० टक्के मार्क मिळवून बारामती तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
साखरवाडीतील मातोश्री कंट्रक्शन चे सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक श्री संजय भोसले यांची कन्या कु. वेदांती संजय भोसले यांना ९८.८० गुण मिळाले असून, त्यांनी बारामती तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला. होळ विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन, श्री सुधीर कांताराम भोसले यांचे सुपुत्र चि. शिवराज सुधीर भोसले यास ९५.२० टक्के गुण मिळाले.
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे विद्या प्रतिष्ठान बारामतीचे प्राचार्य/मुख्याध्यापक श्री. सचिन पाठक सर यांनी शाळेचा नाव दर्जा कायम राखल्याने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, साखरवाडीतील या तीनही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल साखरवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले, आम्हाला मिळालेले यश हे शाळेत मिळालेले उत्तम मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य,चिकाटी व निश्चित ध्येयाच्या दिशेने केलेली वाटचाल यामुळे हे यश संपादन करता आले असे विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शुभेच्छुक....
श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा.फो.९९७०७४९१७७,