फलटण चौफेर दि १७ मे २०२५
फलटण हायस्कूलच्या सन २००९/१० या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवुन विद्यार्थी व शिक्षक यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यात पुर्ण विद्यार्थी घडविणारी एक पिढी एकत्र आल्याने या सर्वांनी आपआपल्या आठवणींना .उजाळा देत एकमेकासोबत मनसोक्त चर्चा केली. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले, लगेच सर्व विद्यार्थी यांच्या वतीने शिक्षकांचे सत्कार करण्यात आले, तब्बल १५ वर्षानंतर हे सर्वजण एकत्र आले होते.औचित्य होते शाळेतील माजी विद्यार्थी स्नेह सोहळा. जवळपास ५० माजी विद्यार्थी १५ वर्षांनी एकत्र आले. शालेय इमारत,जुने शिक्षक व मित्रांना पाहताच या माजी विद्यार्थ्यांचे उर भरून आला. सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत शिकत असताना घडलेले गमंतीदार किस्से, शिक्षण घेताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, शालेय जीवनात झालेली भांडणे, रुसवे फुगवे या साऱ्या जुन्या आठवणीत रमले.
यावेळी सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटत पुढच्या वर्षी एकत्र येण्याचा निर्धार केला.यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेचे माजी प्राचार्य मा. नाळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यमान प्राचार्य मा. काळे सर, तसेच मा. वाघमारे सर, भिसे सर,सस्ते सर, अहिवळे सर, नाळे सर, गुरव सर, जाधव सर,धुमाळ सर, कदम मॅडम, निंबाळकर मॅडम,हे उपस्थित राहिले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका कोकाटे, प्रणाली बोडके यांनी केले तर सर्वांचे आभार अक्षय अबदागिरे, संग्राम नाळे यांनी केले