फलटण चौफेर दि ५ मे २०२५
फलटण तालुक्यात ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना सुरूच असून जिंती ता फलटण येथील पोतेकर नामक १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडून त्यामधील ऑइल सांडून तांब्याच्या तारेची चोरी केल्याची घटना घडली आहे दरम्यान ऐन उन्हाळ्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असून अशातच चोरट्यांनी ट्रान्सफार्मर चोरून नेल्याने मुबलक पाणी असून सुद्धा रानातील उभी पिके जळून चालली आहेत.फलटण तालुक्यात ट्रान्सफार्मर चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने तालुक्यातील हे ट्रान्सफॉर्मर चोरीच सत्र थांबणार तरी कधी? असा सवाल शेतकरी वर्गामधून उपस्थित होत आहे फलटण तालुक्यात मागील काही दिवसापासून ट्रान्सफॉर्मर चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत काही ठिकाणी तर एकाच रात्री दोन दोन ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना घडल्या आहेत ट्रान्सफार्मर चोरी झाला की त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसण्यासाठी महिना ते दोन महिन्याच्या कालावधी लागत आहे अशावेळी शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याचे व वाडी वस्तीवरील राहणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत या वर्षी मुबलक पाऊस पडल्याने विहीरी, ओढे नाले, बोरअरवेल, कालवा हे जलस्त्रोत्र भरून वाहत आहेत कडक उन्हाळा असल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर करत आहे मात्र ट्रान्सफार्मर चोरीच्या वाढत्या घटनांनी शेतकऱ्यांपुढे आता नवीनच संकट उभे राहिले आहे मागील काही दिवसात फलटण तालुक्यातील अनेक ट्रान्सफार्मर चोऱ्या थांबणार तरी कधी?असा प्रश्न सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाला पडला आहे