फलटण चौफेर दि ६ मे २०२५
साखरवाडी ता फलटण येथील बापूराव विठ्ठल मोहिते वय ७५ रा आंबेडकरनगर हे राहत्या घरातून दि २ रोजी सकाळी घरातून निघून गेले होते ते भ्रमिष्ट असल्याने अधून मधून घरातून निघून जात असल्याने घरच्यांनी ते परत येतील म्हणून पोलीस तक्रार दिली नसल्याचे भाऊ दादा मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या खबरी जबाबात म्हटले आहे दरम्यान पिंपळवाडी गावातील एका शेतात दि ५ रोजी एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह काही नागरिकांच्या निदर्शनास आला त्यांनी फलटण पोलिसांना या घटनेची माहिती दिली यावर तात्काळ या ठिकाणी फलटण ग्रामीणचे पोलीस दाखल झाले त्यांनी अधिक तपास करून चौकशी केली असता तो मृतदेह बापूराव मोहिते यांचा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवला व नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत