फलटण चौफेर दि ३ मे २०२५
नांदल ता फलटण गावाच्या हद्दीत मांढरे वस्ती येथे घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे.याबाबत लोणंद पोलीस स्थानकात ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून दत्तात्रेय विठ्ठल मांढरे यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की,१ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्वप्निल दत्तात्रय बोडरे, ललित संतोष चव्हाण,सुरज दत्तात्रय बोडरे, सोमनाथ शिवाजी मदने सर्व रा. तडवळे ता. फलटण, ओमकार बाळू जाधव रा.भाडळे ता.कोरेगाव, रोहित नानासो मसुगडे रा.सालपे व इतर तीन अनोळखी इसमांनी आमच्या घरात घुसून पत्नी मंगल, सुना उषा, संगीता व नातू चैतन्य याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आमचा ड्रायव्हर दीपक राजकुमार गौंड मूळ रा.करेमुवा पोस्ट भैसही थाना बबुरी ता. चकिया जि. चंदोली सध्या रा. नांदल ता फलटण याला त्यातील एकाने वीट मारली त्यामुळे त्याच्या कानाला जखम झाली आहे.तसेच महिंद्रा गाडी नंबर एम एच १४ ई पी ७२८४ या गाडीच्या पाठीमागील काचा फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार येळे करीत आहेत