फलटण चौफेर दि १ मे २०२५
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री पवार -फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलीद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचे विविध उपक्रम गावांमध्ये सुरू आहे फळांचे गाव धुमाळवाडी येथे QR वर क्लिक करून कृषि विभागाच्या विविध योजनाची माहिती मिळवता येणार आहे QR कोडचे प्लेक्स चे आणावर डाळिंब शास्त्रज्ञ माजी सहयोगी संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ गणेश खिंड पुणे डॉ विनय सुपे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विकास जाधव,वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव, कृषी विभागाचे अजित सोनवलकर व कृषी सेवा रत्न सचिन जाधव श्री दत्तात्रय धुमाळ, समीर पवार, विक्रम जाधव, शामराव धुमाळ, बबन हुंबे,आबाजी धुमाळ उपस्थित होते
यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे तसेच गावातच सर्व योजनांची माहिती मिळावी यासाठी कृषी विभागांनी विविध योजनाचे तयार केलेल्या क्यू आर कोड प्लेक्स फळांचं गाव धुमाळवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मध्ये क्यूआर कोड लावण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला कामानिमित्त आल्यानंतर त्या ठिकाणी क्यूआर कोड च्या माध्यमातून त्यांना योजनेची संपूर्ण माहिती मिळण्यास सोपे होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत विविध योजना पोहोचवणे सुखकर होणार असल्याचे यावेळी कृषि सेवा रत्न सचिन जाधव यांनी सांगितलेमोठ्या संख्येने पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते