आयुष्यात निश्चित ध्येय गाठण्याची कुवत, आपल्या मध्ये आहे, त्यासाठी पडेल तेवढे कष्ट घेणारच, हवी तेवढी तयारी करणार, आवश्यक गुणवत्ता मिळवणार,कितीही संकटे आली, अडथळे आले, तरी त्यावर मात करणारच, ही प्रबळ भावना सकारात्मक दृष्टिकोन, आपल्याला यश निश्चितपणे मिळवून देतो, म्हणून अशा सकारात्मक सूचना नेहमी स्वतःला द्या.जे नेहमी उत्साही असतात, आशावादी, व प्रयत्नवादी, असतात, कृतिशील असतात, यश फक्त त्यांनाच आणि त्यांनाच मिळते,
यशस्वी तेच होतात जे निराश करणाऱ्या, हताश करणाऱ्या, परिस्थितीला महत्त्व देत नाहीत,यश मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता तो दृष्टिकोन महत्त्वाचा असतो तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी अडथळे संकटे कठीण परिस्थिती नेमके तुमच्या संदर्भात काय करतात ? तुमची शक्ती काढून घेऊ शकतात, पण त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती, तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणींवर, समस्यांवर, मात करण्यासाठी लढण्याची संघर्ष करण्याची, शक्तीही देतात.अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन सतत डोळ्यापुढे ठेवून, निश्चित ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन, सातत्याने अभ्यास करून निश्चित यशाचं शिखर गाठलेली......... साखरवाडीतील अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील, उच्चशिक्षित मोठ्या बहिणीचा आदर्श घेऊन, आपले बीएससी शिक्षण पूर्ण करून केवळ बसून न राहता, निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागल्या,
यश अपयशाकडे न पाहता, सातत्याने निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून, अनेक वेळा आपल्या वाट्याला आलेले दुःख, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांनी, हताश, निराश न होता परिस्थितीशी संघर्ष करून अपेक्षित यश खेचून आणलेली,
अत्यंत हुशार, सुसंस्कारित.....नुकत्याच MPSC जाहीर केलेल्या निकालासनुसार विद्यानगर साखरवाडी येथील श्री सुरेंद्र शिंदे उर्फ दादा शिंदे, यांची द्वितीय कन्या कु. शिल्पा सुरेंद्र शिंदे, हिची मंत्रालयीन महसूल सहाय्यक (commissioner social welfare) पदी निवड झाल्याबद्दल, तिचे खूप खूप अभिनंदन
शिल्पाने अत्यंत खडतर परिस्थितीत हे यश संपादन केले. कुटुंबाविषयी सांगायचं म्हटलं तर......... श्री. दादा शिंदे पती-पत्नी अत्यंत शांत स्वभाव, गरीब स्वभावाचे, कोणाच्याही सुखदुःखात सहभागी होणारे, प्रसंगी पडेल ते काम करणारे, कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा, शिक्षणाचा खर्च वाढत गेल्याने, दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करून प्रामाणिक व कष्टाच्या जीवावर त्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर व इतर शेती उपयोगी साहित्य खरेदी करून कुटुंबातील मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला त्यांची मोठी मुलगी उच्चशिक्षित, विवाहित असून तिचे पती प्रशासकीय अधिकारी( नगर विकास विभाग) गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
मुलांनी मिळवलेल्या यशाने, केलेल्या कष्टाचे चीज झालेने, आई वडील दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, मिळालेल्या यशाबद्दल कु. शिल्पा म्हणतात,....... प्रत्येक समस्येचे सोल्युशन असते, उत्तर असते, जसे की फळातच त्याचे बीज असते, समस्यांमुळे संधी आणि आव्हाने यांचे दरवाजे उघडतात, त्यातूनच नव्याने शिकायला मिळते, आपल्याला मिळणाऱ्या संधीचा शोध घ्या, निश्चित यश मिळणारच...
कु. शिल्पा यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
शुभेच्छुक
श्री सुशांत, सौ. मोनिका, शिवराज, वेदपाठक परिवार, विद्यानगर साखरवाडी
श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा फो.९९७०७४९१७७