फलटण चौफेर दि २९ एप्रिल २०२५
आज दि २९ रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ट्रक क्र. एम.एच. ५०-५०९६ मधुन बनावट दारूची चोरटी वाहतुक होणार आहे. अशी माहीती मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांचे अधिपत्याखालील पथकास सदर ठिकाणी जावून कारवाई करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांचे पथकाने बोरगाव ता.जि. सातारा गावचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे सर्व्हिस रोडवर उरमोडी नदीचे जयळ पहाटे ३.१० वा चे सुमारास राज्य उत्पादन शुल्क यांचेकडील भरारी पथकासह छापा टाकुन कारवाई केली असता संशयित सचिन विजय जाधव रा. आळसंदता. खानापुर जि.सांगली व जमीर हरुण पटेल रा. आगाशिवनगर मलकापूर ता. कराड जि. सातारा.यांच्या ताब्यात ८४ लाख ४१ हजार ४० किंमतीचा बनावट विदेशी दारुचा माल व १६लाख ५० हजार रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण १ कोटी ९१ लाख ४०रुपये किं.चा माल मिळून आला असून, सदर संशयतांवर बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर कामगिरी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली सदर कारवाई मध्ये अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. मायन चव्हाण, निरीक्षक, राज्य ऊपादन शुल्क यातारा, राहा. पोलीस निरीक्षक बॉडीराम वाळवेकर, बोरगाव पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेकडील, सहा. पोलीस निरीक्षक, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक, विधास शिगाळे, परितोष दातीर, सहा.की. विश्वनाथ संकपाळ, अतिण घाडगे, पो.हवा. साधीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, शरद बंबले, प्रविण फडतरे, रानी आवटे, अमित झेंडे, अजय जाधव, रोहित तोरस्कर, मुनीर मुल्ला, अमोल माने, जयवंत खांडके, प्रमोद सावंत, अमित रापकाळ, राजु कांदळ, शिवाजी भिरा, मनांज जाधव, स्वप्नील कुमार, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, प्रविण कांचटे, ओंकार यादव, रविराज चणेकर, धिरज महाडीक, केतन शिंदे, पृथ्वीराज जागच, विशाल पवार चालक संभाजी साळुंखे, विजय निकम, शिवाजी गुरव, बोरगाव पोलीस स्टेशनकडील मपोउनि रिमता पाटील, प्रविण शिंदे, संजय जाधव, राज्य उत्पादन शुल्क सातारा कजील दुय्यम निरीक्षक, अजितकुमार पाटील, विजय मरोड, जितेंद्र देसाई, कॉन्स्टेयल मनिष माने, नरेंद्र कलकुटगी, शंकर चव्हाण यांनी सहभाग घेतला