साखरवाडी पुढारी वृत्तसेवा - फलटण खुंटे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून मोठमोठ्या खड्डयांनी लोकांचे कंबरडे मोडले असून पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवीत असताना ते खड्डे चुकविण्याच्या नादात किरकोळ व मोठे अपघातांची मालिका सुरू असून हे खड्डे चुकविताना एखाद्याचा जीव गेल्यावर हे खड्डे भरले जाणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान हे खड्डे ताबडतोब न भरलेस या खड्ड्यात वृक्षारोपण करणार असल्याचे खुंटे गावाचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष राजेंद्र अच्युतराव खलाटे पाटील यांनी दिला आहे.
फलटण खुंटे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहने चालविताना वाहनचालक मेटाकुटीला येत असून रस्त्याची झालेली चाळण तुटलेल्या साईडपट्ट्या,खड्ड्यात साठलेले पाणी वाढलेली झाडेझुडपे वेडीवाकडी वळणे यामुळे या रस्त्यावरून येणे जाणे म्हणजे हमखास अपघात तरी किंवा हाडांची व्याधी लागून घेणे अशी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ताबडतोब या रस्त्यावरील खड्डे व साईडपट्ट्या न भरलेस राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने व ग्रामस्थांना घेऊन मोठे आंदोलन झेडले जाणार असल्याचे राजेंद्र खलाटे पाटील यांनी सांगितले आहे.