Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शरयु साखर कारखाना बॉयलर अग्नी प्रदीपन उत्साहात संपन्न

 


     फलटण चौफेर दि. १४ : शरयु साखर कारखान्याने सन २०२४ - २५ या चालू वर्षीच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली असून आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्यात आले आहेत. मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार गळीत हंगामाची तारीख जाहीर झाली असून शरयुने गळीत हंगाम सुरु करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे.   कापशी, ता. फलटण येथील शरयु साखर कारखान्याच्या १० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन शरयू उद्योग समूहाचे चेअरमन  मा श्री श्रीनिवास पवार तथा बापूसाहेब यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला कार्यकारी संचालक मा श्री युगेंद्र दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली गळीत हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे . युनिट हेड श्री विजय जगदाळे सौ जगदाळे या उभयतांनी होम हवन व नवग्रह पूजा केली.शरयुने यावर्षी तालुक्यात उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली असून ३१५१ रुपये एकरकमी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना  अदा केले आहेत. यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी असून फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, खंडाळा, माळशिरस, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी शरयुला घालावा असे आवाहन केले असून यावर्षी ९ लाखाहून अधिक गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रती टन एक किलो याप्रमाणे शरयु साखर कारखाना कार्यस्थळावर इतर गट ऑफिसला सवलतीच्या दरात साखर वाटप चालू करण्याचा निर्णय घेतला असून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी शरयुने गोड केली आहे.कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख उप विभाग प्रमुख कर्मचारी वृंद ठेकेदार ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.