फलटण चौफेर दि १० साखरवाडी ता फलटण येथील श्री भवानीमाता नवरात्र शारदोत्सव मंडळ येथे कै. योगेश विष्णुपंत गायकवाड यांचे स्मरणार्थ शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, श्री ढगाई माता मित्रमंडळ व कै. योगेश गायकवाड मित्रमंडळ होळ यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले आहे श्री भवानीमाता मंदिर (साखरवाडी) येथे रक्तदान शिबीर गुरुवार दिनांक १० रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत होणार असून बहुसंख्येने या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याची आवाहन मंडळाचे अध्यक्ष डी एस भोसले यांनी केले आहे