फलटण चौफेर दि ११ जगायचं कसं? स्वराज्य स्थापन करून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे राजा म्हणून आपण कसं राहायला पाहिजे? हे आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं.देव ,देश, धर्म यासाठी कसं लढलं पाहिजे? विविध संकटांना न डगमगता, न मोडता ,न झुकता आपण उभं राहिलं पाहिजे हेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपणाला शिकवलंआहे. या पुतळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
फलटण येथे आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या पुढाकाराने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. रामराजे ना. निंबाळकर,आ. दीपक चव्हाण, जिपचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, सुभद्राराजे ना. निंबाळकर, विश्वजीतराजे ना. निंबाळकर,भवानीसिंह घोरपडे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती
आ. शिवेंद्रसिंह राजे पुढे म्हणाले,भोसले व नाईक निंबाळकर घराण्याचे संबंध इतिहास काळापासून आहेत. राजकीय समीकरणातून हे संबंध झाले नाहीत. आमचे पिढ्यान पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. राज घराण्यातील कोणीही राजकारणात येऊ नये असे माझ्या आजी सुमित्राराजे यांचं स्पष्ट मत होतं. सामाजिक कार्यात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य त्या पुढे नेहत होत्या .मालोजीराजे ना. निंबाळकर यांनी माझ्या आजीची समजूत काढली. मराठ्यांना, मराठी माणसांना पुढे न्याहायचे असेल तर राजघराण्यातील कोणीतरी राजकारणात आलं पाहिजे, राहिलं पाहिजे तर पुढे कुठे समाजाला दिशा मिळेल. मालोजीराजे यांनी केलेल्या आग्रहामुळे अभयसिंह महाराज राजकारणात आले.1978 साली जनता पार्टीच्या तिकिटावर ते पहिल्यांदा निवडून आले.
आ. रामराजे ना. निंबाळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती मोठी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यास मान्यता मिळाली आहे. महाराजांचं कार्य एवढं प्रचंड होतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा व राणी सईबाई यांच्या समाधीचे काम माझ्या हातून घडावं ही माझी मनोमन इच्छा होती. संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आहे. राजगडाच्या पायथ्याशी राणी सईबाई च्या समाधीचे कामही जोरात चालू आहे. ऐतिहासिक वारसा आपणाला प्रेरणा देतात त्याची आपण जपणूक केली पाहिजे.
आ. रामराजे पुढे म्हणाले आजचा कार्यक्रम राजकीय नाही. दोन घराण्याचे संबंध दृढ करणारा कार्यक्रम आहे. आपले नऊ पिढ्यांचे संबंध आहेत, ते या पुढच्या पिढीतही कायम राहावेत. . महापुरुषांचे पुतळे आपल्यासाठी प्रेरणादायक आहेत. या पुढच्या काळात होळ ता. फलटण येथे मल्हारराव होळकरांचा पुतळा उभारणार आहे. तेथील ऐतिहासिक स्थळाची जपणूक करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून काम पूर्णत्वास नेहलं जाईल. संजीवराजे ना. निंबाळकर यांनी प्रास्ताविकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कार्याचा आढावा घेतला.आ. दीपक चव्हाण यांनी आभार मानले.