फलटण चौफेर दि १६ फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करताना पुरी भाजीतील भाजी मध्ये मेलेल्या पालीचे मुंडके आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत हॉटेलच्या आचारीसह तिघांवर फलटण शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद साहिल अहमद शेख, वय २३ वर्षे रा. सोनवडी बु. ता.फलटण यांनी दिली असून मुकुंद नारायण ढेरे रा.गजानन चौक, फलटण, एकनाथ अर्जुनराव कापसे, रा. मलटण व हॉटेलचा आचारी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि १४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फलटण पंचायत समीती समोर असलेल्या हॉटेल आनंद विलास येथे नाष्टा करीत असताना त्यांना दिलेल्या पुरीभाजीमध्ये पाल सापडली व ही पाल असलेली पुरीभाजी आम्ही खाल्लेने आमच्या जिवातास धोका असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास स फौ संतोष कदम करीत आहेत