फलटण चौफेर दि १ सासकल ता फलटण येथील कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन नुकतेच गौरवण्यात आले या पुरस्काराबद्दल फलटण महसूल विभागामार्फत तहसीलदार फलटण डॉ अभिजीत जाधव यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, तलाठी संघटना अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते