फलटण चौफेर दि १३ अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (दि. १३) गोळ्या झाडून हत्या झाली. गोळीबार करणारे दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. करनेल सिंग (हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, सिद्दिकी सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने पोलिसांनी बिश्नोई गँग तसेच वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्प या दोन्ही अँगलने तपास सुरू केला आहे.
बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या दोन संशयित आरोपी ताब्यात
October 12, 2024
0