फलटण चौफेर दि ३ फलटण पंढरपूर रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी अक्षय फत्तेसिंह धुमाळ वय २५ रा फडतरवाडी ता फलटण हा युवक आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ११ डीपी २५९३ वरून फलटणहून पिंपरदच्या दिशेने जात असताना दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती घटनास्थळावर इतर वाहनधारकांनी रुग्णवाहिकेतून अक्षयला तातडीने फलटण येथे उपचारासाठी हलवले मात्र फलटणमध्ये पोहोचण्या आधीच त्याची प्राणज्योत मालवली फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे