फलटण चौफेर दि.६
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे वीर धरणातून निरा नदी पत्रात 14 हजार ७६१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून वीर,नीरा देवघर व गुंजवणी धरणात आज दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, एकूण पाऊस आणि धरणातील पाणी साठे पुढीलप्रमाणे गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मि.मी. एकूण२८४९मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा व ७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहेभाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मि.मी. एकूण १३००मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून १६१४ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३० मि.मी. एकूण २५४० मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० पाणी साठा झाला असून ७५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ मि.मी. एकूण ५३२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून १४ हजार ७६१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहेचारही धरणात मिळून १००% पाणीसाठा व धरणात एकूण ४८.३ टीएमसी पाणीसाठा असून मागील २४ तासात चारही धरणात मिळून ०.४ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे