फलटण चौफेर दि ३० फलटण तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी असा नावलौकिक असणाऱ्या होळ विकास सोसायटीची ९८वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे विद्यमान चेअरमन सुधीर कांताराम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ तसेच महानंदा डेअरीचे माझी व्हाईस चेअरमन डी के पवार,फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीरामचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब उर्फ सतीश भोसले, रावडीचे माजी सरपंच अनिलराव बोबडे,संजय पाटील, जिल्हा बँकेचे साखरवाडी शाखाप्रमुख प्रकाश पुरी व विकास अधिकारी विजय राऊत व बहुसंख्य सभासदांची उपस्थिती होती यावेळी होळ विकास सोसायटी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब व श्रीमंत रघुनाथराजे नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वेगाने प्रगती करीत असून आगामी वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करणार असल्याचे चेअरमन सुधीर भोसले यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या विविध प्रश्नांचा विकासाच्या बाबतीत विविध धोरणांचा आढावा घेण्यात आला संस्थेचे सचिव राजकुमार अनपट यांनी सन २०२३/२४ चा ताळेबंद वाचून दाखवला सभासदांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे समाधान चेअरमन यांनी केले संस्थेला अनेक वर्षापासून ऑडिट अ वर्ग प्राप्त असून संचालक मंडळाकडून यावर्षी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला