फलटण चौफेर दि २६
निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून आज सकाळी ६ वाजेपर्यंत भाटघर, निरा देवघर वीर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६९ मि.मी. एकूण२४६२मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९६.६९% पाणी साठा व २४४९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८२ मि.मी. एकूण ११२९मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून २२ हजार ६३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२९ मि.मी. एकूण २०८२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून १२ हजार ६० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २३ मि.मी. एकूण ४३८ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ७१ हजार ३४८९ क्यूसेक एवढा विसर्ग सुरू आहे चारही धरणात मागील २४ तासात ६.८ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे