फलटण चौफेर दि ३० आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्यातर्फे साखरवाडी येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी चे महत्व भगवान श्रीकृष्णाने युद्धिष्टरला सांगिताना म्हटले होते की एक जन्माष्टमी करणे म्हणजे २० करोड एकादशी केल्यालचे पुण्य मिळते.श्री गुरुदत्त मंगल कार्यालय येथे जन्माष्टमीच्या निमित्त श्रीमान सुंदरवर प्रभुजी यांनी भगवद गीतेवर अतिशय सुंदर असे प्रवचन केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रमुख मार्गदर्शक साक्षी अच्युत प्रभुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमी पार पडली यावेळी श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडी चे संचालक जितेंद्र धारु यांच्यासह साखरवाडी परिसरातील १५०० होऊन अधिक नागरिक उपस्थित होते