फलटण चौफेर दि ५ फलटण मध्ये पूर्वी सुरू असलेला जनावरांचा बाजार बंद झाला आहे तो पुन्हा सुरू करावा अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षापासून फलटण तालुक्याचा नावलौकिक मिळवलेला. फलटण येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद पडलेला आहे. तो चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध देऊन पुन्हा एकदा सुरु करण्यात यावा, जनावरांच्या आठवडा बाजारामुळे तालुक्यातील शेतकरी व्यापारी व पशुपालकांची चांगली सोय होईल.
तसेच मार्कट कमिटीमधील बंद असलेले गाळे पुन्हा निविदा काढून व्यवसायिकांना उपलब्ध करुन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी व जे गाळाधारक आहेत, त्यांनी पोटभाडेकरु ठेवून त्याचा गोडाऊन साठी वापर फेला जात आहे तसे न करता व्यवसायिकांना व्यचसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करुन दयावेत, जेणेकरुन फलटणचा व्यापार वाढण्यास मदत होईल