फलटण चौफेर दि २८ श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे महात्मा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड येथे आज दिनांक २६ऑगस्ट, २०२४ सोमवार रोजी "सखी सावित्री समिती "मार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थिनींना आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे याचे शिबिर संपन्न.शाळा स्तर सखी समिती मध्ये प्रामुख्याने खालील कार्यांविषयी मार्गदर्शन केले जाते.
यामध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग (CHIRAG) या ॲपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर बाबत शाळेत लावले जाणारे सूचनाफलक, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा(POCSO) अंतर्गत असलेल्या ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधा बाबतची माहिती देणे, ताण तणाव मुक्तीसाठी मुला - मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, सजग पालकत्त्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे,
मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रमुख प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे, मुला- मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकासनासाठी विविध उपक्रम राबवणे, मुलींच्या *स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, मुला- मुलींसोबत आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधने, आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे, तसेच बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाह विषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जागृती निर्माण करणे, सामाजिक भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे, वरील सर्व कार्या विषयांची माहिती सखी सावित्री समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या आजच्या शिबिरामध्ये देण्यात आली. यामध्ये प्रशालेच्या प्राचार्या सौ काकडे मॅडम जेष्ठ शिक्षिका सौ.पुरी मॅडम ,सौ. भोई मॅडम, सौ. बनकर ,मॅडम ,सौ. झणझणे,मॅडम सौ. शिंदे मॅडम यांनी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी अडचणी, समस्या बाबत सखी सावित्री समिती मधील सदस्या बरोबर संवाद साधला. आनंदी व उत्साही वातावरणात "सखी सावित्री समितीचे शिबिर " संपन्न झाले. या शिबिरामध्ये सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे उत्तरे प्रशालेच्या प्राचार्य सौ काकडे मॅडम व ज्येष्ठ शिक्षिका पुरी मॅडम ,भोई मॅडम ,बनकर मॅडम, झणझणे मॅडम , सौ शिंदे मॅडम यांनी दिले