साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
फलटण ग्रामीण पोलिसांनी साखरवाडी व खामगावच्या हद्दीत तीन ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकून तीन संशयतांवर कारवाई केली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार, साखरवाडी येथे दि २४ रोजी घराच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लोकांकडून जुगारासाठी पैजेवर पैसे घेत असताना संशयित बाळू प्रल्हाद अहिवळे वय ५१ रा साखरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या ताब्यातून ५५० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व बाळू पांडुरंग मदने वय ६२ रा पाच सर्कल खामगाव यांच्या ताब्यातून ५२५ रुपयाची जुगाराचे साहित्य चांदणी चौक साखरवाडी येथून जप्त केले असून खामगाव ता फलटण गावातील संशयित राजेंद्र उत्तम चांगण वय ५६ रा खामगाव हे दि २३ रोजी उघड्यावर स्वतःच्या आर्थिक फायद्याचा फायदा करिता लोकांकडून जुगारासाठी पैजेवर पैसे घेताना आढळून आले त्यांच्या ताब्यातून ५१० रुपयांचे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे पुढील तपास पोलीस फौजदार पांडुरंग हजारे करीत आहेत