Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

३ लाख ७० हजारांच्या वीज चोरी प्रकरणी फलटण शहरातील व्यावसायिकावर गुन्हा दाखल

 


फलटण चौफेर दि २५ फलटण शहरातील बुवासाहेब नगर येथील एका व्यवसायिकाने  वीज चोरी करून  ३ लाख ६८ हजार ८५०  रुपयांचा दंड न भरल्याबाबत  फलटण शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, फलटण शहरातील बुवासाहेब  नगर येथील संशयित महावीर संभाजी कोकरे यांच्या  सर्वे नंबर ७१/४ मधील एम के बाजार या दुकानाला पोल वरून आलेली इन्कमिंग सर्विस वायरला विज मीटरच्या अगोदर पत्र्याच्या शेडवर  कट करून एमसीबी च्या साह्याने वीज मीटरवर वीज वापरण्याची योग्य नोंद होणार नाही अशी व्यवस्था करून वीज चोरी चालू असल्याचे स्पष्ट दिसून आले वीज चोरी करणारे यांना व्यावसायिक दराने ४१ महिने कालावधीचे १७ हजार ५७२ युनिटचे ३ लाख ६८ हजार ८५० रुपये व तडजोड देयक १० हजार रुपये विज चोरीचे देयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण अर्बन उपविभागीय कार्यालयामार्फत देण्यात आले वीज बिल व तडजोड देयक वीज ग्राहक महावीर संभाजी कोकरे यांनी भरले नाही यांचे विरुद्ध लबाडीने  वीज चोरी करून कंपनीचे फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून  फिर्याद

वर्षा संतोष गायकवाड, व्यवसाय नोकरी, रा वनवासवाडी,यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.