फलटण चौफेर दि ३० तत्कालीन माण- फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. धोंडीरामदादा वाघमारे हे माणुसकीचे खोरे होते. त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचे काम त्यांचे सुपुत्र अभय वाघमारे यांनी हाती घेतले असून त्यांना भविष्य उज्ज्वल आहे. आम्ही फलटणकर जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे उद्गार रयत बँकेचे चेअरमन राजेंद्र शिर्के यांनी काढले.
खराडेवाडी (फलटण) येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेत ३० ऑगस्ट रोजी अभय धोंडीराम वाघमारे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला, यावेळी शिर्के बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक दादासाहेब खटके, श्रीराम शिक्षण संस्थेचे संचालक विराज बेडके, हनुमंत खटके पाटील, हनुमंत लोंढे, प्रताप मोरे, दयानंद बनसोडे, चंद्रकांत माने, सावंत सर, पोळ सर, काळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र शिर्के म्हणाले, तत्कालीन माण-फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. धोंडीरामदादा वाघमारे यांनी दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचे खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी या भागाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. दादा हे एक बहुआयामी व माणुसकी असलेले लोकप्रतिनिधी या भागाला लाभले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव अभय वाघमारे हे त्यांचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम करत आहेत. आज त्यांनी स्वतःचा वाढदिवस फलटण येथील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत गरीब कुटुंबातील मुला मुलींच्या सोबत साजरा करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे त्यांचेही भविष्य उज्वल आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अभय वाघमारे म्हणाले, संस्कारक्षम व निरोगी आरोग्यदायी तरुण पिढी घडवण्याचे काम मी फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहे. माझे वडील स्वर्गीय दादा यांचे कार्य खूप मोठे होते. त्यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम भविष्यात आपणही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या वतीने अभय वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणामध्ये अभय वाघमारे यांच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले तसेच अभय वाघमारे यांनी शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थीना स्व. धोंडीराम वाघमारे यांनी लिहिलेला 'हुंदका' काव्यसंग्रह भेट दिला. तसेच विद्यार्थ्यांबरोबर पंगतीला बसून भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतसर यांनी केले तर आभार काळेसर यांनी मानले