खराडेवाडी शिवाजी भोसले
खराडेवाडी ता फलटण गावाच्या हद्दीत चार चाकी गाडी इको कार व मालवाहतूक ट्रेलर यांच्यामध्ये धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळाल्या अधिक माहितीनुसार, खराडेवाडी ता फलटण हद्दीत गावाच्या स्वागत कमानी समोर इको कार क्रमांक एम एच ४२ बीबी ७८०३ व ट्रेलर कमांक के ए २८ डी ३८९८ यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला असून यामध्ये खामगाव ता फलटण येथील देवडे कुटुंबीय जखमी झाले असल्याचे घटनास्थळावर उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले