फलटण चौफेर दि २८ : नाना पाटील चौकात दि २६ रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६ जर्सी जातीच्या कालवडींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रवीण श्रीपाल ढवळे यांनी फलटण शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून संशयित अल्ताफ रमजान शेख (रा. आसू ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अल्ताफ हा त्याच्या पिकअप क्र एम एच ११ सी एच ६८९३ मधून कत्तलीसाठी सहा कालवडी घेवून जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही जनावरे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत वाहन व कालवडी असा २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.