फलटण चौफेर दि २
फलटण ग्रामीण परिसरातून होत असलेल्या सुचली चोरी होत आहेत त्याबाबत विशेष पथक नियुक्त करून सदर गुन्हे उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ग्रामीण पोलिसांना आदेश दिलेले आहेत त्यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, पोलीस अंमलदार नितीन चतुरे , श्रीनाथ कदम अमोल जगदाळे हणमंत दडस हे पायी गस्त करत असताना कुरवली येथे पूर्वी रेकॉर्ड वरील सराईत निखिल सुरेश जाधव वय २५ रा.तावडी ता. फलटण संशयितरित्या मिळाला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता चोरी गेलेल्या ३ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ४ दुचाकी सापडल्या आहेत त्यापैकी एक गुन्हा हा अल्पवयीन बालका बरोबर केला आहे. तसेच अटक आरोपी हा फलटण शहर पोलीस हद्दीतील गुन्ह्यामध्ये फरारी आहे . तसेच आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होऊ शकतात.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल ,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सुनील महाडिक , पो उप निरीक्षक गोपाळ बदने , नितीन चतुरे ,वैभव सूर्यवंशी, संजय अडसूळ, तात्या कदम ,अमोल जगदाळे,हणमंत दडस ,श्रीकांत खरात यांनी केलेली आहे.