फलटण चौफेर दि ३ फलटण शहरात रविवार दि ५ रोजी संपुर्ण दिवसभर विविध पक्षाच्या सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सदर दिवशी फलटण शहरात गर्दी होण्याची शक्यता नाकरता येत नाही, या करिता शहरातील कायदा व व्यवस्था राखणे कामी रविवार दिनांक ५ रोजी होणारा आठवडी बाजार रद्द करणेत येत आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे