फलटण चौफेर दि २१
७सर्कल साखरवाडी ता फलटण येथे दि २० रोजी रात्री ९.३० वाजता भावजशी भांडणे मिटवण्यासाठी बोलणे चालू असताना संशयित आशा राजेंद्र करचे, शुभम राजेंद्र करचे, वृषाली बनेश्वर काळे, उमेश (पूर्ण नाव माहित नाही) यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद प्रकाश किसन काळे वय २३ राहणार बिल्डिंग नंबर २५ महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई यांनी दिले असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ बनेश्वर काळे यांना संशयतानी मारहाण करून रिक्षा क्रमांक एम एच ०३ सीडी १४१९ ची काच फोडून, ट्यूबलाईट फोडून व संतोष होळकर यांच्या मोटरसायकलचे तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार हजारे करीत आहेत