Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिंती येथील नीरा नदीमधून होणारा बेकायदा पाणी उपसा व उत्खननाचे काम त्वरित बंद करावे शेतकऱ्यांची प्रांताधिकऱ्यांकडे मागणी

 


फलटण चौफेर दि २८

जिंती ता फलटण गावाच्या हद्दीतील निरा नदी मधून होत असलेला बेकायदा पाणी उपसा व उत्खननाचे सुरू असलेले काम त्वरित बंद करावे अशी मागणी जिंतीतील शेतकऱ्यांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना निवेदनाद्वारे केली आहे   शेतकऱ्यांनी  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

 खुंटे, ता. फलटण येथे असलेल्या निरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दरवर्षी पावसाळ्यानंतर शेती व पिण्याचे पाणी साठविणेसाठी अडवला जातो. त्याचा लाभ फलटण तालुक्यातील जिंती, खुंटे, बारामती तालुक्यातील को-हाळे व लाटे गावातील हंगामी पिके व जनावरांसाठी चारा पिके घेण्यासाठीही होतो तसेच विहीरी व बोअरवेललासुद्धा त्याचा लाभ होतो त्यासाठी या सर्व गावातील नदीकाठचे शेतकरी दरवर्षी शासनाला शासकीय रक्कम अदा करत असतात. सदरील बंधा- यातील पाणी एप्रिल-मे पर्यंत शेतीसाठी उपयोगाला येते.परंतु, जिती, ता. फलटण येथील शेती महामंडळाची जमीन करार पद्धतीने घेतलेल्या व्यक्तीने अवैधतरीत्या ऊस पिकाच्या लागवडीसाठी पाणी उपसा करणेचा घाट घातलेला आहे व नदीपात्रात अवैधरीत्या उत्खनन करुन विहीर खोदणेचे कामास सुरुवात केलेली आहे. तसेच, उत्खनन करणेसाठी भूसुरुंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करणेत येत आहे. त्यामुळे जिंती गावातील इमारतींना तडे गेलेले आहेत. निरा नदीकाठावरील चारा पिके व हंगामी शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तसेच, दुष्काळी परिस्थितीमध्ये विहीरी व बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे भविष्यात चा-यांचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच, शेती महामंडळाची शेती कराराने घेतलेले तीन प्लॉटधारक त्यांच्या शेततळ्यामध्ये पाणी भरणेसाठी शेती पिकासाठी निरा उजवा कालवा सिंचन विभागाने सोडलेल्या पाटपाण्याचा चोरुन शेततळे भरणेसाठी वापर करत आहे. त्यामुळे  येथील शेती महामंडळाची जमीन करार पद्धतीने घेतलेल्या व्यक्तीने अवेधतरीत्या पाणी उपसा करणा-यांवर व पाणी चोरुन शेततळे भरणा-यांवर  कारवाई करावी व शेतक-यांना न्याय देण्याची मागणी केली आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.